मला अजूनही आठवतंय

रोजच्या धकाधकीत आपल्याला मागे वळून बघायला वेळच नसतो.

मग आता थोडा वेळ थांबूया आणि अमेरिकेतल्या आपल्या आयुष्यातला तो एक दिवस किंवा एक प्रसंग आठवूया, तो बरा वाईट कसाही असो पण जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही.

आपण त्या अनुभवाचा Podcast बनवणार आहोत. ह्या Podcast द्वारे आपण तो अनुभव सर्वांपर्यंत पोचवणार आहोत. आणि ते सुद्धा तुमच्या शब्दात.

ह्या Podcast च्या विषयांना बंधन नाही पण Podcast सात ते दहा मिनिटांचा असेल. सर्वांनाच Podcast तयार करणे शक्य नाही हे आपण समजू शकतो, म्हणून, तुमच्या सोयीसाठी तुमचा अनुभव आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याचे Podcast मध्ये रुपांतर करू. अनुभव तुमचा, आणि संपादन व आवाज आमच्या निवेदकांचा, अर्थात श्रेय तुम्हालाच.आणि तुमच्या भाषा शैलीची जपणूक केली जाईलच याची काळजी घेतली जाईल.

प्रत्येकी फक्त एक entry स्वीकारली जाईल. दर आठवड्यास एक Podcast प्रसिद्ध केला जाईल. हा Podcast लोकांना मोफत download करता येईल तसेच मोफत subscribe करता येईल. तुमचा अनुभव सांगा, इतरांचेही ऐका.

अर्थात यासाठी काही नियम पाळायचे आहेत

१. विषयांना जरी बंधन नसले तरी कुठल्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर असू नये.
२. सर्व साधारणपणे शंभर शब्द वाचण्यास एक मिनिट लागते, त्याप्रमाणे अनुभवाचे लिखित पाचशे शब्दांच्या आसपास असावे.
३. कोणाचाही नावाने उल्लेख करू नये व करावयाचाच असल्यास त्या सर्वांची लेखी परवानगी सोबत जोडावी लागेल
४. ह्या Podcast मधील मजकुराची जबाबदारी तुमची असेल पण संपादनाचे व Podcast चे सर्व हक्क निवड मंडळाच्या स्वाधीन असतील.
५. Podcast प्रकाशनाचा निर्णय फक्त निवड मंडळाचा व अंतिम राहील.
६. ह्या Podcast साठी कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा करू नये.

अधिक माहितीसाठी ई मेल पाठवा.
bmmpodcast@gmail.com

BMM podcasts CDs

These CDs can be ordered by calling Mohan Ranade at 215-354-1423 / 267-981-5170 or by sending an e-mail to brihanmm@gmail.com.

Click on following link for BMM podcasts CD
http://www.bmmonline.org/BazaarMenu page