June, 2013

मंडळी नमस्कार,
घटका भरत आली, नवऱ्या मुलीला आणा असं जेव्हा भटजी लग्नात वधुपित्याला सांगतात तशीच काहीशी भावना माझ्या मनात आहे. गेली दोन वर्षे ज्या अधिवेशनासाठी बॉस्टनमधील न्यू इंग्लंड मराठी मंडळाच्या आणि ऱ्होड आयलंड येथील मराठी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले त्याच्या पूर्ततेची घडी जवळ आली आहे. अवघ्या एक महिन्यावर आपलं बृहन्महाराष्ट्र मंडळाचं १६वं अधिवेशन येऊन ठेपलंय. ऋणानुबंध या संकल्पनेवर भर देऊन कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, साहित्य अशा विविध पैलूंना फुलवणाऱ्या एका उत्तम अनुभूतीची ग्वाही मी तुम्हाला देतो. याच आपल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) आनंद यात्रेत सामिल होण्यासठी आमंत्रण घेऊन १० मे रोजी भारताचे न्यू यॉर्क मधील कौन्सिल जनरल श्री. ज्ञानेश्वर मुळे यांना भेटलो.
ज्ञानेश्वर यांनी जेव्हा ते न्यू यॉर्कमधे सूत्रे स्वीकारत आहेत असे कळवले तेव्हा भारत सरकार नुसत्याच एका उत्तम भारतीय विदेश - सेवा - अधिकाऱ्याला (ऌऊद ऑफिसरला) अमेरिकेत पाठवत नसून मराठी साहित्यातल्या एका उत्तम लेखकाला पाठवतेय याचा विशेष आनंद झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात लाट या गावातला ज्ञानेश्वर मुळ्यांचा जन्म. तिथे एस. टी., वीज अशा प्राथमिक सुविधाही नव्हत्या. अशा गावातल्या शेणाने सारवलेल्या मराठी माध्यमातल्या शाळेत मांडी घालून ज्याने ग म भ न गिरवले, तोच मुलगा आता उच्च पदावरील ऌऊद ऑफिसर झाला आहे. ज्ञानेश्वर मुळ्यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मवृत्तपर पुस्तक खरोखरच बरेच काही विचार करावयास लावणारे आणि स्फूर्ती देणारे आहे.
आपल्या समाजात ध्येयाने झपाटलेली अनेक माणसे आहेत आणि त्यातले माझे एक श्रद्धास्थान म्हणजे आमटे कुटुंबीय आणि त्यांनी महाराष्ट्रात चालवलेली कार्य. याच आमटे कुटुंबीयातील डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाताई आमटे ह्यांच्या जीवनावर डॉ प्रकाश बाबा आमटे the real hero’ असा चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शिका अ‍ॅड. समृध्दी पोरे करत आहेत. या आमटे दांपत्याला यापूर्वी बृहन्महाराष्ट्र मंडळाने आपल्या अधिवेशनात बोलावून सन्मानित केले होते. या चित्रपटात बृ. म. मंडळाच्या अध्यक्षांची भूमिका मी करत आहे. भूमिकेच्या लांबीरुंदीपेक्षा त्या निमित्ताने सतत चंदनाच्या खोडाप्रमाणे इतरांसाठी झिजणाऱ्या ह्या महान कर्मवीराचे कार्य जवळून बघता आले हा मी माझा बहुमान समजतो.
नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी ह्यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या या चित्रपटाचे आणि त्यातून डॉ आमटे ह्यांचे हेमलकसा येथे चाललेले कार्य बघण्यासाठी उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळी न,च जोरदार स्वागत करतील ह्याची मला खात्री आहे.
चित्रपटाचे माध्यम माझ्यासाठी तसे नवीन होते. पण नाना, सोनाली, समृध्दी आणि सर्व चित्रपट-संचाबरोबर काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. मराठी आणि हिंदी भाषेतून प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटाद्वारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे नांव घरोघरी पोहोचेल हे न,.
ह्याच बृ. म. मंडळाचे नाव जगात उज्वल करणाऱ्या आपल्या उत्तर अमेरिकेतील साहित्य, उद्योग, युवा, मराठी शाळा, विज्ञान व तंत्रज्ञान या विभागातील बृ. म. मंडळ पुरस्काराचे मानकरी बृ. म. मंडळाच्या प्रॉव्हिडन्स येथील अधिवेशनात सन्मानित होतील. सर्व विजेत्यांना मानाचा मुजरा! You all are carrying ऑकक flagship in North America. त्याच सोबत कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की- २०१५ च्या बृ. म. मंडळ-अधिवेशनाचे यजमान होण्याचा मान महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलिसला मिळाला आहे अशी मी अधिकृत घोषणा करतो. महाराष्ट्र मंडळ लॉस अँजलिसच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सदस्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. आलेल्या अर्जातून बृ. म. मंडळ पुरस्काराच्या मानकऱ्यांची आणि २०१५च्या अधिवेशनाच्या यजमानपदासाठी मंडळ निवडीसाठी निवड-समितीवर काम केलेल्या सर्व परीक्षकांचे आभार.
गेली दोन वर्षे बृ. म. मंडळ संस्थेसाठी अध्यक्षपदावरून काम करतांना आपल्या सर्व मंडळांना आणि त्यातल्या सदस्यांना मी कायम बृ. म. मंडळाचा परिवार मानले. संस्थेच्या विविध उद्दिष्टांवर काम करतांना या सर्वात माझी साथ देणाऱ्या माझ्या कार्यकारिणीचे, सल्लागार समितीचे आणि असंख्य स्वयंसेवकांचे औपचारिकरित्या आभार न मानता मी त्यांचा कायम ऋणी राहू इच्छितो.
अधिवेशनात भेटूच. तूर्त अर्धविराम... धन्यवाद,
आपला,
- आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com, फोन: 302-559-1367