August 2011

 बृहन्महाराष्ट्र मंडळांमधल्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना आशिष चौघुलेचा आदरपूर्वक नमस्कार.

      कै. विष्णु वैद्य, कै. शरद गोडबोले आणि सौ. जयाता‌ई हुपरीकर यांच्या पुढाकाराने २५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाला एक जाज्वल्य आणि दैदिप्यमान परंपरा आहे. गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्राची संस्कृती, चालीरीती, परंपरा इथे उत्तर अमेरिकेत BMM ने जोपासली आणि वाढवली.

      BMM चा अध्यक्ष या नात्याने तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात तो सार्थ करत, ती जाज्वल्य परंपरा चालू ठेवून, मूळच्या तत्त्वांना बाधा न आणता, सध्याच्या Globalization च्या युगात संस्थेचा कारभार अधिक वैश्विक करण्याची आणि वाढवण्याची ग्वाही मी तुम्हा सर्वांना देतो.

      मी स्वतःला Cross over community चा सदस्य मानतो. मी स्वतः आतापर्यंत जोपासलेल्या BMM च्या Values जाणतो, पण तेव्हाच उत्तर अमेरिकेतल्या बदलत्या demographics ला कुठल्या गोष्टी आवडतात, रुचतात याचीही मला कल्पना आहे. या World is flat च्या युगात नव्या जुन्याची सांगड कशी घालायची यावर आमचा मुख्य भर असेल.

      मंडळाच्या कार्यकारिणीवर अजय दांडेकर, नमिता दांडेकर, राहुल कर्णिक, सुनील सूर्यवंशी, सुचिता कुलकर्णी-लांबोरे, वसुधा पटवर्धन, जयंत भोपटकर हे आपापल्या मंडळांत कामकाजाचा उत्तम अनुभव असलेले माझे सहकारी आले आहेत, तसेच trustees मध्ये मोरेश्वर पुरंदरे. संस्थेच्या विविध उपक्रमांतून वेळोवेळी तुमची आणि त्यांची भेट हो‌ईलच.

      आमची कार्यकारिणी ही execution च्या नात्याने ८ जणांची असली तरी वेळोवेळी मौलिक सहकार्य करणारे सल्लागार समितीचे सदस्य, Community Leaders, Past Presidents, Past Conveners या सर्वांचे सहकार्य, मार्गदर्शन हवंय.

      कुठल्याही संस्थेच्या खऱ्या यशाचं गमक असतं ते teamwork मध्ये. म्हणूनच Community या शब्दाची शेवटची ५ अक्षरं आहेत Unity. Unity builds great community.

      मंडळी, आपल्याला शाळा सोडून खरं तर कित्येक वर्षे लोटली तरी आपल्याला जशी अजूनही आपल्या शाळेबद्दल आत्मीयता असते, तशी BMM बद्दल उत्तर अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीला जवळीक वाटायला हवी. ती वाटून देण्यासाठी आमची कार्यकारिणी झटेल.

      मराठी शाळा, NAME, मैत्र, Talent Transfer, Visiting Artists, Successful Aging (उत्तररंग), हे तसेच इतर अनेक उपक्रम राबवण्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य हवं आहे. मला सांगण्यास अतिशय आनंद वाटतो की आपलं 2013 चं अधिवेशन अमेरिकेतल्या शिक्षणाच्या पंढरीत, म्हणजेच Boston येथे ठरलं आहे. संयोजक बाळ महाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आमचं काम सुरू आहे. BMM चं कार्य म्हणजे जणू जगन्नाथाचा रथ आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने तो ओढायचाय.

      कळावे लोभ असावा, असेल तर तो अधिक वाढावा ही नम्र विनंती.

आपला,

आशिष चौघुले

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ

achaughule@gmail.com