Feb, 2014

मंडळी,
जानेवारी महिन्यातील पहिली सु- संपली. आता पुढचा लाँग वीक-एंड एकदम चार महिन्यानंतर मे महिन्यामधे! तो पर्यंत माना खाली घालून काम करावे लागणार. तसं म्हटलं तर, भारतीय दिनदर्शिका पाळली नाही तर, आपल्यापैकी कुणालाही अमेरिकेतील वास्तव्य आणि दैनंदिन अतिशय कंटाळवाणे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आपल्या पूर्वजांनी पहा किती चांगली समाजरचना करून ठेवली आहे. प्रत्येक महिन्यात सणावाराच्या निमित्ताने काही ना काही स्नेहसंमेलन (सोशल गॅदरिंग) करता येते.
काही दिवसांपूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलमधे एक लेख वाचण्यात आला. त्यामधे जगभरातील बेकारीवर, अमेरिकेच्या अती उत्पादनक्षम (ओवर प्रॉडक्टिव) कामगारांवर, त्यामुळे त्यांना पडणाऱ्या अभूतपूर्व मानसिक तणावावर इलाज म्हणून कामाचा आठवडा फक्त चार दिवसांचा करावा, असा सल्ला नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी दिला होता. बाकीच्या वेळात हे कामगार त्यांच्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवतील, जास्त प्रमाणात भेटीगाठी/ स्नेहसंमेलने करतील, त्यामुळे देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल, नवीन नोकऱ्या निर्माण होतील असा उद्देश होता. एकंदरीत लेखाचा उद्देश हा - माणूस हा सामाजिक प्राणी आहे, आणि एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा सर्वांनी मिळून काही काम केले तर, ते काम सुलभरित्या लवकर होवू शकते, आणि सर्वाना फायदेशीर होते.
लॉस अँजलिस मराठी मंडळामधे नुकत्याच झालेल्या संक्रांतीच्या कार्यक्रमात कदाचित आपल्याला याचा प्रत्यय आला असेल. थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता वाढवणारा तीळगुळ थोर मोठ्यांना देवून प्रेम वाढवणारा हा समयोचित सण आपल्या पूर्वजांनी किती विचार करून ठेवला असेल बरे ! लॉस अँजलिसमधे श्री. सचिन सोनट, यांच्या नेतृत्वाखाली नवीन समितीने संक्रांतीचा देखणा कार्यक्रम साजरा केला. लहान मुलांच्या विविध गुणांचे दर्शन करणाऱ्या तब्बल ३७ कार्यक्रमांनी हा सण उत्साहात पार पडला. मागील महिन्यातील पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे अशा सणाची उपयुक्तता भविष्य काळात अधिकाधिक वाढेल हे निश्चित. पोलर वोर्टेक्सच्या तडाख्यामुळे आर्क्टिकवरील गार हवेचेपट्टे - सैबेरियामधे जाण्याऐवजी अमेरिकेमधे आले, आणि अर्ध्याहून अधिक अमेरिका बर्फाच्या लाटेत गुंडाळली गेली. आमच्या नंदनवनात या थंडीचा कडाका जाणवला नसला तरी, दुष्काळाचे नवीनच संकट उभे राहिले आहे. गतवर्षी लॉस अँजलिसमधे फक्त तीन इंच पावसाची नोंद झाली. अनेक धरणे आणि भूमिगत पाण्याचे साठे अर्ध्याहून अधिक कमी झाल्यामुळे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी नागरिकांना वीस टक्के , पाणी कपात करायची सूचना केली आहे.
एकंदरीत नवीन वर्षाची सुरुवात ही वातावरणाच्या बदलामुळे सुरू झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. ह्याच बदलाचा परिणाम म्हणून की काय, अधिवेशन समितीच्या कार्यकर्त्यांनी कात टाकून नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली आहे. अधिवेशनासाठी तयार करण्यात आलेल्या बावीसही समित्यांनी आपले काम जोरदार सुरू केले आहे. अधिवेशनाची हॉटेल्स जवळजवळ प, केली आहेत. अधिवेशनासाठी देणगी देणाऱ्यांसाठी समितीने खास Early Bird buy viagra Discount ची घोषणा केली आहे. जे लोक ३१ मार्च पर्यंत देणगी देतील त्यांच्या $१००० देणगीला $५० ची सूट, $२,५०० देणगीला $७५ ची सूट व $५००० देणगीला $१०० ची सूट जाहीर करण्यात आली आहे. सभागृहातील पुढच्या जागा संपण्याआधी वृत्ताचे वाचक याचा लाभ घेतील, अशी आम्ही आशा करतो. लॉस अँजलिस, मिशिगन आणि अ‍ॅरिझोनाच्या देणगीदारांनी याचे महत्त्व ओळखून आधीच देणग्या दिल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील तर आमच्याशी info@bmm2015.org वर संपर्क साधावा.
अधिवेशन समितीने जाहीर केलेल्या लोगो (बोधचिन्ह) आणि स्लोगन (घोषवाक्य) स्पर्धेची घटिका आता भरत आली आहे. आपल्यातल्या कलाकारांना जागवण्याची वेळ आली आहे. मैत्र पिढ्यांचे’ या अधिवेशनाच्या विचारधारेवर आधारित बोधचिन्हाची संकल्पना १५ फेब्रुवारीपर्यंत आपण spardha@bmm2015.org या ईमेलवर पाठवू शकता. ही संकल्पना कागदावर रेखाटून, स्कॅन करून पाठवली तरी, चालणार आहे, त्यासाठी डिजिटल डिझाईन पाठवण्याची गरज नाही. अधिवेशन समितीस जी संकल्पना आवडेल त्या संकल्पनेचे डिजिटल रुपांतर करुन घेईल. तसेच या स्पर्धेविषयी अथवा अधिवेशन विषयी इतर कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला ३१०-७७६-५५९३ या फोन-क्रमांकावर मिळू शकते. त्या व्यतिरिक्त स्पर्धेविषयी आणि अधिवेशनाविषयी अधिक माहीती आपल्याला अधिवेशनाच्या http://bmm2015.org या वेबसाइटवर मिळू शकेल.
माणूस सामाजिक प्राणी आहेच, पण उत्तर अमेरिकेतील मराठी माणूस हा बहुधा इतर माणसांपेक्षा काकणभर अधिकच सामाजिक प्राणी असावा! म्हणूनच आपण हा द्वैवार्षिक अधिवेशनाचा घाट घातला आहे. आपण सर्वजण अधिवेशनविषयीच्या वेगवेगळ्या उपक्रमाला आतापर्यंत जो प्रतिसाद देत आहात, त्यातून हेच सिद्ध होत आहे!

- आनंद वाळुंजकर, (लॉस अँजलिस, कॅलिफोर्निया)