Apr, 2014

नमस्कार मंडळी,
सध्या होळी, रंगपंचमीचा सण अनेक मंडळांमधे साजरा होत असतो. काहीजण त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम करतात. काही मंडळे कलाकारांचे कार्यक्रम सादर करतात. काही अभारतीय लोकही होळीच्या उत्सवात सामील होऊ लागली आहेत. त्या सोहोळ्यात सर्व इच्छुकांना मैदानावर बोलावून संगीताच्या ठेक्यावर हवेत रंग उधळतात, व रंगांचे विलोभनीय दृश्य निर्माण करत असतात. महाराष्ट्रात होळीच्या वेळी झालेल्या पावसामुळे व मोठ्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरी होळी पेटलीच नाही हे नमूद करावेसे वाटते.
२९ मार्च रोजी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सत्कारार्थ न्यू जर्सी येथे कलावैभव आयोजित "माझ्या गाण्यांची जन्मकथा" हा अतिशय चांगला कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. हृदयनाथजी अप्रतिम गाण्यांच्या सादरीकरणाबरोबरच त्यांच्या खास शैलीत अनेक किस्से सांगत होते, तेव्हा गझल या नावाचे रहस्य श्रोत्यांना त्यांनी सांगितले. एक पारधी, जो अनेक दिवस मुलाबाळांना अन्न पुरवू शकत नाही, एके दिवशी तो शिकार करताना एका हरिणाच्या मागे धावत असतो. ते हरीण तिच्या बछड्यांसाठी स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळत असते. पळतापळता एका झाडीत ते अडकते. पारधी त्याचा बाण घेऊन हरिणाला मारणार, त्याच क्षणी त्या दोघांची नजरानजर होते. ती नजर म्हणजे "गझल." त्यात आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले क्रौर्य, प्रेम, वात्सल्य, करुणा या सर्व भावना सामावलेल्या असतात.
कौशल इनामदार व त्यांचा चमू लवकरच अमेरिकेत पोहोचणार आहेत, तेव्हा सर्व मंडळे व रसिक प्रेषक त्यांच्या स्वागतासाठी व कार्यक्रम ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. मार्च महिन्यात सर्व मंडळांचे अध्यक्ष व मंडळ प्रतिनिधींसमवेत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) कार्यकारिणीची फोनवर Town Hall Meeting बोलावण्यात आली. त्यात जवळपास तीसहून अधिक मंडळांचे प्रतिनिधी होते. ही सभा अतिशय माहितीपूर्ण व खेळीमेळीची होती, असे अनेकांचे म्हणणे होते. बृ. म. मं. कार्यकारिणीने व विश्वस्थांनी बृ. म. मंडळाच्या सध्याच्या अनेक नवीन उपक्रमांबद्दल माहिती दिली. मंडळांच्या प्रतिनिधींनी यावर आपल्या काही कल्पना आणि बदल सुचविले. त्यावर आम्ही विचार करून अपेक्षित असे बदल न,च घडवून आणू. उत्तररंग या विषयीही आमची अनेक मंडळातील उत्तररंगाच्या प्रतिनिधींसमवेत (दूरध्वनीवर) एक सभा झाली. त्याचा सविस्तर वृतांत या अंकात पान सात वर जरूर बघावा.
भारतात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. तेव्हा आपल्या भारतातील वृत्तवाचकांना सांगावेसे वाटते, "Bad officials are the ones generic viagra soft elected by good citizens who do not vote." आपण चांगला विचार करून मत द्या, आम्ही सर्व अनिवासी भारतीय मायभूमीच्या प्रेमापोटी चांगल्या निर्णयाची आतुरतेने वाट बघत आहोत.
बृ. म. मंडळ २०१५च्या अधिवेशनाची जय्यत तयारी चालू आहे, हे वेगळे सांगायला नको. अधिवेशनाचे घोषवाक्य आणि बोधचिन्ह स्पर्धा विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. त्याबद्दल अधिक माहिती या अंकात आहेच. मागच्या निधीसंकलनाच्या योजनेला प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिसादामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत असतो, तेव्हा सर्वांना धन्यवाद. लवकरच बोलूयात.
कळावे लोभ असावा.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com