Apr, 2014

LAलकारी

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक जुनी म्हण आहे. लॉस अँंजलिस अधिवेशनाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळणार आहे याची एक झलकच आम्हाला नुकत्यात पार पडलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेच्या निमित्ताने पहायला मिळाली. सुमारे १००हूनही अधिक घोषवाक्ये आणि ५०हून अधिक बोधचिन्हाच्या संकल्पना संपूर्ण उत्तर अमेरिकेतून आम्हाला मिळाल्या. अशा स्पर्धेला सर्वसाधारणत: प्रतिसाद आला नाही तर मुदत वाढवून द्यायला लागेल की काय, अशी शंका आम्हाला वर्षाच्या सुरुवातीला वाटत होती. पण प्रत्यक्ष परिस्थिती अशी आली, की लोकांना मुदत संपली आहे आता कृपया प्रवेशिका पाठवू नका असे सांगावे लागले! आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपले जेव्हढे आभार मानावे तेव्हढे कमीच!
ही स्पर्धा ज्या मीडिया आणि मार्केटिंग समितीतर्फे घेण्यात आली, त्या समितीतील तीन जणांनी आलेल्या प्रवेशिकांमधून घोषवाक्ये व ५ बोधचिन्हे निवडून १५ जणांच्या संचालक समितीकडे पाठवली. समितीच्या माहितीकरता त्यांना इतरही सर्व प्रवेशिका पाठवण्यात आल्या. संचालक समितीने मतदान करून त्यातून तीन घोषवाक्ये व तीन बोधचिन्हे निवडली. ही घोषवाक्ये व बोधचिन्हे मग बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन समितीकडे पाठवण्यात आली. या समितीने त्यातून एक घोषवाक्य व एक बोधचिन्ह निवडले. मैत्र पिढ्यांचे" ह्या अधिवेशनाच्या संकल्पनेनुसार तीन रंगात असणाऱ्या तीन पिढ्या व त्यांनी हातात हात घालून मराठी संस्कृतीची मशाल जळत ठेवली आहे असे या बोधचिन्हातून प्रतित होते. या मशालीच्या कमळाच्या आकाराच्या ज्वाळा आणि त्यातून प्रज्वलित झालेल्या ठिणग्या लॉस अँंजलिसच्या सुप्रसिद्ध "हॉलीवूड वॉक ऑफ फेम"चे प्रतीक आहे.
उत्तर अमेरिकेत वाढत असलेल्या अनेक मराठी पिढ्या अधिवेशनात एकत्र येऊन आपल्या कला, आपली संस्कृती आणि आपल्या मायमराठीची जपणूक साता समुद्रापार करत आहेत, हे मैत्र पिढयांचे जपे वारसा, कला संस्कृती मायबोलीचा या घोषवाक्यातून सहज पद्धतीने व्यक्त झाले आहे. अधिवेशनाचे बोधचिन्ह निर्माती शीतल वागळे रांगणेकर, आणि घोषवाक्य निर्माते मनोज ताम्हनकर यांचे अधिवेशन समितीतर्फे हार्दिक अभिनंदन!
२९ मार्चला सर्व स्वयंसेवकांची बैठक झाली. अधिवेशनाचे समन्वयक श्री. शैलेश शेट्ये यांनी या बैठकीत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले, आणि बोधचिन्ह व घोषवाक्य विजेत्यांची घोषणा केली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाचे (http://bmm2015.org) अनावरणही केले. मुंबईच्या सॉनिक ऑक्टेव्हच्या राजेंद्र वैशंपायन यांच्या सहकार्याने ही वेबसाइट तयार केली आहे. "मैत्र पिढ्यांचे" या अधिवेशनाच्या संकल्पनेनुसार बाल, युवा, तरुणांपासून मोठ्यांसाठी कार्यक्रम होणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्तर अमेरिका कार्यक्रम समितीने कार्यक्रमाच्या प्रवेशिका स्वीकारणे सुरू केले आहे! उत्तर अमेरिकेतील ज्या कलाकारांना आपले कार्यक्रम अधिवेशनात सादर करण्याची इच्छा आहे, त्यांनी वेबसाइटवर जाऊन कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटीज विभागातील NAPC RFP buy cheap cialis Form मध्ये माहिती भरावी! याबद्दल अथवा अधिवेशनासंबधित इतर कुठल्याही माहितीकरता, info@bmm2015.org या ईमेलवर किंवा ३१० ७७६ ५५९३ या फोनवर संपर्क करता येईल.
अधिवेशन समितीने जाहीर केलेली देणगीमधील खास सवलत गुढीपाडव्यानिमित्त १५ एप्रिल २०१४ पर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत ४०० हूनही अधिक लोकांनी देणग्या देऊन आपल्या खास व्ही आय पी सीट राखून ठेवल्या आहेत. या देणग्या अंशत: करमुक्त असून मंडळाच्या वेबसाइटवर आणि फेसबुक पेजवर प्रत्येक देणगीमागे किती टॅक्स डिडक्शन घेता येईल तेही अधिवेशन समितीने जाहिर केले आहे.
वृत्ताच्या सर्व वाचकांना अधिवेशन समितीकडून मराठी नववर्षानिमित्त (गुढीपाडवा) हार्दिक शुभेच्छा !!
- वैभव पुराणिक (लॉस अँंजलिस)