Nov, 2015

MI मराठी - आपलं अधिवेशन

आपण भारतीय असल्याचा आपल्याला जितका अभिमान असतो, तितकाच अभिमान आपल्याला आपण मराठी असल्याचा असतो! ज्या मराठी मातीने आपल्याला शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आणि बाजीराव पेशवे दिले, त्याच मराठी मातीने आपल्याला फुले, आंबेडकर, सावरकर आणि टिळक दिले. ज्या मराठी मातीने आपल्याला संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ दिले, त्याच मातीने आपल्याला शिरवाडकर, माडगूळकर, शांता शेळके आणि पु.ल. दिले. तिनेच नरेंद्र दाभोळकर दिले, तिनेच बाबा आमटे दिले, तिनेच गोड गळ्याची लता दिली आणि तिनेच आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन दिला! आपल्यापैकी असा क्वचितच कोणी असेल, ज्याला आपण मराठी असल्याचा अभिमान वाटत नसेल. पण तरीसुध्दा आपली हवी तशी ओळख अजून निर्माण व्हायची आहे.
पुढील संभाषण तुम्हांला परिचयाचं वाटतं का?
- Are you from India?
- That's right.
- From which part of India?
- Umm.. Western part.
- You mean Bombay? The city of Bollywood?
कल्पना करा, "You mean Bombay? The city of Bollywood?" ह्याऐवजी "So, are you Marathi?" असा प्रश्न जर समोरच्याने विचारला, तर आपल्याला किती बरं वाटेल! हीच आपण मराठी असल्याची आपली अमेरिकेतली ओळख असेल! आज जवळपास अडीच लाख मराठी माणसं अमेरिकेत कर्तृत्व गाजवत असताना, त्यांची 'भारतीय' वंशाचे असल्याच्या पलिकडे जाऊन 'मराठी' ही ओळख असायला काहीच हरकत नाही. ही ओळख निर्माण करणं हे एकट्‌या-दुकट्याचं काम नाही. आपण सगळे मिळून जेव्हा प्रयत्न करू, तेव्हाच हे शक्य होईल. मग हे प्रयत्न करायचे तरी कसे? आपण सगळेच आपल्या माय-मराठीशी प्रेमाच्या नात्याने जोडलेले आहोत, आणि त्या नात्यातूनच आपण एकमेकांचे बांधव ठरतो. आपण आपल्या मराठी भाषेशी, संस्कृतीशी असलेले ऋणानुबंध जितके घट्ट करू, तितके आपण एकमेकांच्या जवळ येऊ आणि आपल्या माय मराठीची कीर्ती जगभरात पसरवू शकू!
प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही पहिल्या पावलापासून होते. आपल्यामध्ये आपुलकी वाढवण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या जवळच्या मराठी मंडळांना आणि त्यानंतर सगळ्या मंडळांमार्फत बृहन्महाराष्ट्र मंडळाशी जोडले गेलो पाहिजे. ह्याच बांधिलकीतून, आणि परिणामी निर्माण होणाऱ्या जिव्हाळ्यातून आपण आपल्या माय-मराठीची ओळख संपूर्ण जगाला करून द्यायला सज्ज होऊ शकू. हाच आपल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०१७ साली डेट्रॉइटमध्ये होणाऱ्या अठराव्या अधिवेशनाचा गाभा आहे. ह्या गाभ्यावर आधारित एक बोधचिन्ह (Logo) आणि एक बोधवाक्य (Slogan) आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपण एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. स्पर्धेचे नियम आणि प्रवेशिका पाठवायचा पत्ता लेखाच्या शेवटी दिले आहेत.*
अधिवेशनाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊन, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मांदियाळीत, सगळे मिळून मराठी अस्मितेची ज्योत धगधगती ठेवणार आहोत. एकीकडे आपण आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असताना, त्याचबरोबर आपल्या मायमराठीची कीर्ती जगभरात पसरवायला सज्ज होणार आहोत. मग आपलं हे अधिवेशन उत्तमोत्तम करण्यासाठी साजेसं असं बोधचिन्ह आणि बोधवाक्य सुचवायचं काम करणार ना? अहो, आपण नाही करायचं तर मग कुणी करायचं! अपेक्षा आहे भरभरून प्रतिसादाची.
आपलाच विनम्र, एक मराठी बांधव!
- सुशांत खोपकर (डेट्रॉइट)

* Slogan and Logo Design Competition Guidelines

Slogan and logo design need to include key elements of BMM2017 vision in terms of:
Enhance belonging to the Marathi community.
Bring Marathi to the forefront.
As the 2017 ​convention will be in Detroit, ​although it is not mandatory, we encourage you to incorporate Detroit/ Motor city or Automotive aspect in your slogan and logo.
Slogan should be in Marathi.
Logo Image Resolution: No less than 300 dpi.
Logo entries must be submitted as an image format (png, jpg, gif, tiff). Please note that we would also need the original file (PSD or Coral draw files with the fonts embedded).
Text in logos should be converted to outlines.
No photographs or stock images as part of Logo.
The slogan and logo should be original, unpublished work and not based on any pre-existing copyrighted work.
Entries should not violate the intellectual property rights of any individual/entity.
Entries will be judged based on creativity, originality and relevance to the theme.
Logo will also be evaluated based on how it looks in all different media and sizes.
All the rights of the designs would be belonging to BMM 2017 team once the entry is submitted. BMM 2017 team reserves the right to adopt the slogan and logo with some changes.
Last date of submission is 31st January, 2016.
Entries for slogan and logo design competitions should be submitted to slogan@bmm2017.org and
logo@bmm2017.org respectively.
Winner will be selected by the BMM Convention Committee. In case we get two or more similar winning entries, a winner will be selected by drawing a lottery. The judge’s decision will be final.
One winner from each of the two competitions will receive a free registration (equivalent to $300) to 2017 BMM Convention in Detroit!