कोमल चौक्कर, महाराष्ट मंडळ लॉस एंजेलीस, विलेपार्ले, मुंबई. – अर्वाइन, कॅलिफोर्निया:
बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) आणि महाराष्ट मंडळ लॉस एंजेलीस (एमएमएलए) यात माझा अतिशय उत्कट आणि समर्पित सहभाग आहे. माझे आपल्या समाजातील तीन पिढ्यांशी दीर्घकाळ संबंध आहेत. बीएमएमच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य आणि आपले साहित्य यांचे प्रदर्शन घडवण्याकरीता मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी मला मराठी शाळेचे काम करणे आवडेल.
मला विश्वास वाटतो की बीएमएमचे लॉस एंजेलीस येथील २०१५ चे अधिवेशन, २००९ पासून बीएमएमची मराठी शाळा आणि एमएमएलए कार्यकारिणी येथील माझा सहभाग आणि माझ्या अनुभवांनी मला आपल्या तरुण पिढीला मंडळाच्या पंखाखाली आणण्यासाठी तयार केले आहे. मला बीएमएम तसेच स्थानिक मंडळांची सदस्यता वाढवणाऱ्या सेवा आणि आपल्या समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचे उपक्रम सुधारण्यासाठी काम करणे आवडेल. मी बीएमएम कार्यकारिणी मध्ये “वेस्ट कोस्ट” नेतृत्व भूमिकांचा दृष्टीकोन आणेन आणि आपल्या समाजाला बळकट करण्यासाठी बीएमएमला एक पाऊल पुढे नेईन.