बृहन्महाराष्ट्र मंडळ गौरव गीत
मराठी तितुका मेळविण्याची अहोरात्र चळवळ
परदेशातील कुटुंब अपुले महाराष्ट्र मंडळ,
बृहन्महाराष्ट्र मंडळ IIधृII
जमुनी रमती उत्तररंगी नागरिक ज्येष्ठ
मुलांस शिकवू मायबोली जी सुधेहून श्रेष्ठ
आरोग्याचा सल्ला मिळतो जैसे गंगाजळ II१II
नृत्य नाट्य संगीत कलांचा सुंदर आविष्कार
देशी-विदेशी कलाकार ते करती त्यां साकार
मनापासूनी करती कौतुक प्रेक्षक चोखंदळ II२II
उद्योगाची मिळे प्रेरणा, अर्थाचे मंथन
रेशीमगाठी कुणी बांधती मनास मिळता मन
ध्यानधारणा, पूजा शमविती मनातला गोंधळ II३II
अज्ञाताचा शोध घेतसे ज्योतिष, तत्त्वज्ञान
लक्ष्यवेध करण्यास सज्ज हो सैन्यातील जवान
मायदेशीही मदत पाठवी भरभरूनी ओंजळ II४II
युवा पिढीला देऊ वारसा होवो संस्कारी
वृत्तासंगे जाई वार्ता दिशांतून चारी
करू उन्नती सगळे मिळुनी हीच एक तळमळ II५II
🎵 गीत श्रेय
शब्द: अनिता म. कांत; संगीत: मंजुषा जोशी
स्वर: चिन्मय जोग आणि मयुरी कुडाळकर
Chorus: हृषीकेश केळकर, अमित जोशी, संजना पाटणकर, मानसी दिक्षित
रेकॉर्डिंग: संदीप पाटणकर (Gracenote Studio)
विशेष साहाय्य्य: पंढरीनाथ माने
निर्मिती: बृहन्महाराष्ट्र मंडळाचे मासिक वृत्त