 
															BMM-Philosophy
उपक्रमाचे उद्दिष्ट
मनुष्यजन्मप्राप्तीनंतर जीवनाच्या सर्वोच्च विकासासाठी, विवेकाच्या माध्यमातून आत्मानंदाची प्राप्ती. हिंदू धर्माने प्रस्थापित केलेले मानवी जीवनाचे चार स्तंभ धर्म, अर्थ, काम व मोक्ष. धर्माचे पालन करीत, अर्थ व कामाने जीवन समृद्ध करीत, अंतिमतः मोक्ष प्राप्ती. अध्यात्मशास्त्र व जीवन ह्यांचे हेतू जर परस्परपूरक असतील तर मानवी जीवनाच्या साफल्यासाठी अध्यात्मशास्त्राचा उपयोग झाला पाहिजे. अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा म्हणजे मानवी जीवन व मानवी जीवनाच्या अंतिम ध्येयासाठी अध्यात्मशास्त्र अशी ती परस्परपूरकता आहे.
उपक्रमाचे ब्रीदवाक्य: शाश्वत आनंदाचा धर्म..!
उत्तर अमेरिकेतील मराठी समाजासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ हे केवळ एक सांस्कृतिक व्यासपीठ नसून, आपल्या बौद्धिक आणि अध्यात्मिक परंपरेच्या संवर्धनासाठी झपाटून कार्य करणारी संस्था आहे. 'तत्वज्ञान उपक्रम' ही त्या कार्याची एक महत्त्वपूर्ण दिशा असून, वैदिक विचारसरणी, भारतीय इतिहास व अध्यात्म यांच्या विषयी ज्ञानोत्सुक; जिज्ञासा असणाऱ्या समाजासाठी हा बृहन्महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रम राबवला जातो. वेळोवेळी कार्यकारी समिती सद्गुरू परमपूज्य श्री. मंगेशदादा फडके यांचे मार्गदर्शन घेते. विविध अध्यात्मिक प्रवचनमाला, शास्त्र व विज्ञान, तसेच इतिहास व्याख्यानमाला अशा माध्यमातून माहिती व मार्गदर्शन केले जाते. परम पूज्य श्री. मंगेशदादांचे प्रवचन दौऱ्यातून स्थानिक साधकांना मार्गदर्शही केले जाते. दौऱ्यांच्या दरम्यान मिळालेल्या प्रतिसादात्मक सूचनांतून अध्यात्मिक शिबिरांचे आयोजन केले जावे अशी मागणी आलेली असल्याने. अश्या शिबिरांचे आयोजनहि तत्वज्ञान उपक्रम करण्याचे योजत आहे. या कार्यामागे एकच हेतू आहे. आपल्या संस्कृतीतील चिंतनपरंपरेचा साक्षेपाने अभ्यास करून, ती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून आत्मिक समृद्धीचा मार्ग शोधणे.
Every Tuesday 6:00 PM - 7.30PM Pacific Time / 9:00 PM - 10:30 PM Eastern Time Meets every Tuesday on Zoom. Sessions are held in Marathi or English.
To join the Whatsapp group fill out this form. At the end of the form click on the link to
join the Whatsapp group.
Philosophy Group
Mrunal Bujone
Rajan Modak: rajendra.modak@bmmonline.org
Rupali Badwe
Snehal Kelkar
Vrushali Raut : vrushali.raut@bmmonline.org
आनंदाचे तत्वज्ञान वक्ते:
 
															आनंदाचे तत्वज्ञान वक्ते:
सद्गुरू परम पूज्य श्री.मंगेशदादा फडके आजच्या आधुनिक युगात तत्त्वज्ञानाचे पर्यायाने परमार्थाचे स्थान, त्याचा मूळ उद्देश, आपल्या वैयक्तिक आयुष्यात असलेले त्याचे महत्व, त्याची जीवनाभिमुखता, पारमार्थिक जीवन जगून आपण काय कमावतो अन्यथा काय गमावतो या अत्यंत मुलभूत विषयांना स्पर्श करणारे विवेचन
All previous and current series recordings are available on bmm-philosophy YouTube channel.
Please subscribe to YouTube Channel
| Malika / दौरे / BMM convention | YouTube Playlist | 
|---|---|
| 
													आनंदाचे तत्वज्ञान – विभाग २
तत्वज्ञान म्हणजे नक्की काय? (What)
सद्गुरू परम पूज्य श्री.मंगेशदादा फडके												 | |
| 
													आनंदाचे तत्वज्ञान – विभाग १
तत्वज्ञान का समजावून घ्यायचे (Why)
वक्ते: सद्गुरू परम पूज्य श्री.मंगेशदादा फडके												 | |
| 
													Consciousness, Science, and the Self: A
Journey with Dr. Vinod D. Deshmukh												 | |
| 
													केनोपनिषद – ह्या उपनिषदाची अत्यंत विलक्षण
गोष्ट म्हणजे ह्यात वापरलेली परस्पर विरोधी
(paradoxical) भाषा. ब्रह्मज्ञान व्यक्त करण्यासाठी
भाषेचा हा सर्वात उच्च प्रयोग समजला जातो. ह्या
सत्रात आपण या उपनिषदातील काही मंत्र
अभ्यासले.
वक्ते: श्री. शशांक चिटणीस												 | |
| 
													वेदकालीन भारत – थळ धार्मिकता आणि बालिश
बुद्धिवाद हे दोन्हीही झुगारून, शुद्ध वैदिक
जीवनपद्धतीचा शास्त्रशुद्ध विचार
वक्ते: डॉ. श्री. विक्रम पत्तरकिने												 | |
| 
													श्रीराम कथामृत – सद्ग्रंथ वाचन -वक्त्या: आ. सौ. सोनालीताई फडके												 | |
| 
													पतंजली योगसूत्रे व आधुनिक वैद्यकशास्त्र – म.
पतञ्जलींनी योग दर्शन सूत्रांमध्ये रचले. त्यामुळे
योगसाधनेला शास्त्रकाट्याची कसोटी प्राप्त झाली!!
हीच योगसूत्रे आणि त्यात सांगितलेले ध्यान,
प्राणायाम आणि आसनांचे अगणित फायदे आता
आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या माध्यमातून सिद्ध
करता येतात. जाणून घेऊया पतंजली योग modern
medicine च्या चष्म्यातून.
वक्ते: डॉ. प्रकाश लोथे. (MD, FAAP)												 | |
| 
													महाभाग्यवान स्वामी विवेकानंद
वक्ते: सद्गुरू प. पू. श्री. मंगेश फडके												 | |
| 
													विवेके शोधीले पाहिजे – विवेक, वैराग्य यांचा न्याय व
मीमांसा यांच्याशी असलेला घनिष्ठ संबंध आणि यांचे
आधुनिक जीवन, व्यवहार आणि संशोधन यातील
महत्व संक्षिप्त रूपाने सांगणारे विवेचन
वक्ते: श्री. निलेश निळकंठ ओक												 | |
| 
													शरण मी पायी – आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत
अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त
अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच
शरणागती सुफळ संपूर्ण होते. – वक्ते: डॉ. चंद्रशेखर
मायानील												 | 
प्रवचन दौरे - वक्ते: पू. श्री. मंगेश फडके
| Malika / दौरे / BMM convention | YouTube Playlist | 
|---|---|
| 
													पंचकोश – पाचही कोशांची लक्षणे काय, मी
नेमका कोणत्या कोशात प्रामुख्याने अडकलो आहे,
त्याचा निरास करुन ध्यान कसे साधायचे इत्यादी समजावून घेतले.												 | |
| 
													SPIRITUALITY AND LIFE
Are these really two different things?												 |  | 
| 
													मनाचे श्लोक
श्लोकांच्या माध्यमातून योगाचे सार												 |  | 
BMM Convention
| Malika / दौरे / BMM convention | YouTube Playlist | 
|---|---|
| 
													तत्वज्ञान – परिसंवाद
प.पू. स्वामी गोविंद देव गिरी महाराज आणि पू. श्री.
मंगेश फडके												 |  | 
Philosophy Group
Mrunal Bujone
Rajan Modak: rajendra.modak@bmmonline.org
Rupali Badwe
Snehal Kelkar
Vrushali Raut : vrushali.raut@bmmonline.org
 
				