बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे ज्या वर्षी अधिवेशन होत नाही त्यावर्षी “मैत्री मेळावे” साजरे केले जातात.
या मेळाव्यांचे स्वरूप प्रादेशिक पातळीवर मर्यादित असते – थोडक्यात यजमान मंडळाच्या आजूबाजूच्या पाच सहा मंडळांनी एकत्र येऊन हा मेळावा साजरा केला जातो.
त्यामुळे प्रादेशिक मंडळांना त्यांचे कार्यक्रम एका मोठ्या रंगमंचावर घेऊन जाण्यास मदत होते आणि जास्त लोकांना या सुंदर कार्यक्रमांचा आनंद लुटता येतो.
कार्यक्रमाची रंगत अधिक वाढण्यासाठी काही वेळा यजमान मंडळ भारतातूनही मनोरंजनाचे कार्यक्रम आणते.
२०२५ या वर्षी एप्रिलमध्ये डॅलस, तर जून मध्ये क्लीव्हलंड येथे हे मेळावे साजरे करण्यात आले.