मराठवाडा पूरग्रस्त मदत निधी संकलन
गेले काही दिवस तुम्ही महाराष्ट्रातील बातम्या वाचत असालच. मराठवाड्यात भीषण पूर परिस्थिती आहे. जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळा तर्फे महाराष्ट्राच्या ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ ला आम्ही १ लाख रुपयांची देणगी अर्पण करत आहोत.
आपत्तीच्या काळात कोणतीही मदत रकमेने लहान वाटू शकते, पण खरी किंमत त्या मागच्या भावनेत असते.
ही देणगी हा एक प्रतीकात्मक प्रयत्न आहे: महाराष्ट्रातील लोकांना हे जाणवून देण्यासाठी की उत्तर अमेरिकेतील मराठी समाज त्यांच्या दु:खद प्रसंगी त्यांच्या सोबत आहे.
आपत्ती आपल्याला एकतेची ताकद दाखवून देतात. आपल्यासाठी खरी यशस्वीता म्हणजे केवळ एका संस्थेची मदत नव्हे, तर अनेक व्यक्ती आणि संस्थांना या कार्यात सामील होण्यासाठी प्रेरित करणे हीच होय.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या “समाजरंग” या उपक्रमामार्फत आपण या आपल्या बांधवांच्या पाठीशी उभे राहू शकतो.
आम्ही सर्व मंडळाच्या अध्यक्षांना आवाहन करीत आहोत की त्यांनी आपापल्या मंडळात “मराठवाडा पूरग्रस्त मदत निधी संकलन” (Marathawada Flood Relief Fundraiser) जाहीर करावे.
गेल्या काही दिवसांत आम्ही ‘ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन’, ‘महाराष्ट्र फाउंडेशन’, ‘सेवा इंटरनॅशनल’ तसेच ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या सर्व संस्थांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाला सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. सध्या या संस्थांतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमध्ये मदतकार्य सुरू आहे.
उत्तर अमेरिकन मराठी समुदायाने शक्य तो परीने आपल्या संकटग्रस्त बांधवांना मदत करावी ही नम्र विनंती.,
‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून केलेली आपली मदत खूपच परिणामकारक असेल.
BMM encourages donations to these organizations:
You can even donate to BMM and we will send the money to above organizations.
Or
Donate using Zelle:
zelle@bmmonline.org