छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व मराठी माणसांचे दैवत आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सारा इतिहासच बदलला. पुढे पेशव्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार अटकेपार केला. हा सगळा इतिहास आपण शिकलो.
जर तुमच्या मुलांना मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास समजावून सांगायचा असेल, तर आपण लहानपणी जी पुस्तके वाचली ती परत एकदा त्यांच्याबरोबर वाचा आणि आपले पूर्वज कोण होते, त्यांनी काय पराक्रम केला, ते समजावून सांगा.
आम्हाला खात्री आहे की त्यांना पण त्यांच्या पूर्वजांचा अभिमान वाटेल आणि न कळतच त्यांच्या ही तोंडून शब्द बाहेर पडतील “शिवाजी महाराज की जय!”.
ही पुस्तके अमेरिकेत वाढलेल्या मुलांना वाचायला जरा अवघड आहेत, त्यामुळे पालकांनीच मुलांबरोबर पुस्तकातील धड्यांचे वाचन करावे आणि मुलांना समजावून सांगावे.
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे मुलांची परीक्षा घेण्यात येईल आणि यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
पुस्तकांच्या PDF copy साठी खालील मुखपृष्ठांवर क्लिक करा
बालभारती संग्रह पाहण्यासाठी येथ क्लिक करा