पॉडकास्ट जसे तुम्ही रेडियो किंवा काही रेकीडेंड ऑडिओ ऐकता तसच आहे. पण पॉडकास्ट आणि रेडियो मध्ये फरक असा आहे की रेडियोवर तुम्ही हवा ती शो ऐकू शकत नाही. पण पॉडकास्ट मध्ये तुमचे आवडते शी तुम्ही डाऊनलोड करून ठेऊ शकता. काही ऑन टाइम तर काही ऑन डिमांड असतात. तुमची अनेक काम करत जसं, तुम्ही गाण ऐकता तसच तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता.
उत्तम, सुलभ, सोपे आणि ज्या गोष्टीतून काही शिकायला मिळते अश्या मराठी गोष्टी, कथा ऐकण्यासाठी. वेगवेगळ्या गॅजेटवर सारखे सारखे काहीतरी बघत व्यस्त असणाऱ्या डोळ्यांना आराम मिळती. काही हातात घेऊन बघत बसायचं नसतं.
तुम्ही कुठे पेष्ठ शकता?. कारमधून जाताना, आई-बाबा स्वयंपाक करताना, मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्टिविटी बघताना ऐकू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री तुमच्या लाडक्या बाळाला झोपवताना तुम्ही थोपटण्याचा काम करा आणि गोष्ट मात्र आम्ही ऐकवू, गोष्ट ऐकताना ऐकणारा आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करतो आणि त्यानुसार ती मनावर साकारती, शब्द हे एकच माध्यम असल्याने ते स्मरणात घट्ट बसतात पक्के होतात. प्रत्येक गोष्ट, कथा, कहाणी आपल्या लालित्याने वेगवेगळे शब्द घेऊन, वेगवेगळी ठेवण, लय, उच्चार घेऊन येते. ऐकणाऱ्याची भाषा आणि शब्दसंपत्ती समृद्ध करत जाते