डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांची अमेरिका संवादयात्रा (जून - ऑगस्ट २०२६)

सुदृढ मन सर्वांसाठी

Mental Health for All

डॉ. आनंद नाडकर्णी  शिक्षणाने  मनोविकारतज्ञ असले तरीही त्यांना मनोविकासतज्ञ म्हणणे अधिक योग्य ठरेल.  मनाचे स्वास्थ्य ह्या विषयाला असलेले महत्व संपूर्ण समाजाला पुन्हा एकदा ठसवून सांगणारा हा मनआरोग्य  कार्यकर्ता  आपल्या महाराष्ट्रात गेली पंचेचाळीस वर्षे कार्यरत आहे.  मनोविकार म्हणजे ‘वेडे’ होणे ह्या पारंपारिक भूमिकेला छेद देऊन मनाच्या विकारांबरोबरच मनाचा विकास महत्वाचा ह्या सूत्राभोवती एक आगळी संस्था स्थापन करून विविध सेवा, उपक्रमांतून समाजातील पूर्वग्रह दूर करण्याचा प्रवास आज लाखो माणसांपर्यंत पोहोचला आहे.

डॉ. नाडकर्णी हे निष्णात मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांच्या आयपीएच (Institute for Psychological Health)  ह्या संस्थेमध्ये त्यांच्यासोबत कार्यरत व्यावसायिक तसेच प्रशिक्षक स्वयंसेवकांची संख्या साडेतीनशेच्या वर आहे.  स्वयंसेवी क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये असे दुसरे उदाहरण नाही. 

महानगरी भागापासून शहरी वस्त्या, ग्रामीण आणि आदिवासी भागापर्यंत मनआरोग्य उपक्रम पोहोचवण्याचे अनेक उपक्रम त्यांनी तयार केलेच आहेत.  त्याबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, चित्रकला, तत्वज्ञान, इतिहास, व्यवस्थापनशास्त्र अशा अनेक विषयांचा उपयोग त्यांनी जनजागृतीसाठी केला आहे.  त्यांच्या असाधारण संवादशैलीच्या जोरावर त्यांनी ‘आवाहन आयपीएच’ हे यूट्यूब चॅनेल भारतातील मनआरोग्याचे सर्वात मोठे चॅनेल बनवले आहे.  दोन हजाराहून जास्त व्हिडीओज आणि साडेचार लाख सभासद हे आजचे ह्या चॅनेलचे मापदंड आहेत!

मोठमोठ्या कंपन्या, नवउद्यमी, कमांडोज, कलाकार, खेळाडू ह्या सर्वांच्या भावनिक आरोग्याचे सेवा प्रकल्प चालवताना गेली चाळीस वर्षे ते दर वर्षी शंभरहून जनजागृती कार्यक्रम देशभर घेत आहेत.  पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे ते सहसंस्थापक असून विद्यमान अध्यक्ष आहेत.

साडेबाराशेहून अधिक मुलाखती घेणारा सूत्रसंचालक, साठाहून अधिक गीते लिहून त्यांना चाली देणारा संगीतकार , बसल्या जागी रेखाचित्रे बनवणारा चित्रकार, सत्तावीस पुस्तकांसोबत नियमित सदरलेखन करणारा लेखक, व्यावसायिक ते प्रायोगिक नाटके सादर करणारा नाट्यलेखक ह्या साऱ्या प्रवासात त्यांनी आपली वैयक्तिक रुग्णसेवासुद्धा चार दशके अथकपणे सुरु ठेवली आहे.

असे बहुआयामी व्यक्तिमत्व अमेरिकेच्या संवाद दौऱ्यावर प्रथमच येत आहे.  डॉ. आनंद नाडकर्णी सादर करू शकतील अशा कार्यक्रमाची एक यादी सोबत जोडत आहोत.  त्यांना वैयक्तिक आर्थिक लाभाची अपेक्षा नसून आपल्या संस्थेच्या उपक्रमांसाठी आर्थिक बळ मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

आपण आयोजित करू शकता असे जाहीर कार्यक्रम:

 अ)  दृकश्रावय सादरीकरण आणि चर्चा :

  • रहस्य माणुसकीचे, भविष्य माणुसकीचे.
  • संतांचे मानसशास्त्र
  • चला बांधूया ‘भावना अपार्टमेंट’
  • बुद्धांसोबत क्षणोक्षणी
  • अध्यात्म आणि मानसशास्त्र
  • विकारांकडून विवेकाकडे
  • आग्र्याहून सुटका: आणीबाणी व्यवस्थापन
  • दांडी यात्रा : प्रकल्प नियोजन
  • सुभाषबाबू : वन मॅन टू  आर्मी
  • विनोबा: स्व चे विसर्जन
  • विवेकानंद: तो महामानव, ते भाषण
  • लोकमान्य : व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व
  • विनोबा : चार पुरुषार्थ
  • फिल्मी नागमें और आपका ई.क्यू

ब) संवाद/गप्पा स्वरूपाचे Interactive कार्यक्रम

     (साठ ते संभर पर्यंतच्या वयोगटासाठी)

  • मस्तमजेचे आईबाबा (पालकत्व)
  • ह्या ‘मी’ चे काय करायचं ?
  • तणावाचे नियोजन करायचे कसे?
  • नाती कोमेजू नयेत म्हणून …..
  • संतापवर बोलू काही
  • मनोविकार ते मनोविकास : चार दशकांचा प्रवास
  • एक मन, अनेक दालने
  • मुक्तांगणच्या गोष्ट
  • आयपीएच  :सुदृढ मनाची सत्यकथा
  • इतके सारे सुचते कसे?
  • सायकिऍट्रिस्टचे तणाव नियोजन

क ) गप्पा स्वरूपाचे कार्यक्रम

  • एखाद्या संध्याकाळी १५-२० जणांच्या गटासाठीसुद्धा करता येतील.

Tentative US Tour Plan:

Date City
June 27 – July 4
NJ/NY
July 5 – July 8
Boston
July 9 – July 11
Virginia/Maryland/DC
July 12 – July 18
Chicago
July 19 – July 22
Minneapolis
July 23 – July 24
Houston
July 25 – July 26
Austin
July 27 – August 1
Orlando
August 2 – August 5
San Jose
August 6 – August 9
Seattle

Contact Us: