मराठवाडा पूरग्रस्त मदतनिधी संकलन अहवाल (Marathwada Flood Relief Fundraising Report)

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सचिव, श्री नरेंद्र कल्याणकर यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली - त्यावेळी त्यांनी “मराठवाडा पूरग्रस्तांच्या” मदतीसाठी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे १ लाख रुपयांचा धनादेश "मुख्यमंत्री सहायता निधीला" देणगी दाखल सुपूर्द केला.

सप्टेंबर २०२५ मध्ये मराठवाड्यात भीषण पूरस्थिती उद्भवली होती, ज्यामुळे जीवितहानीसह खूपच मोठी वित्तहानी झाली. याचा मोठा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या “समाजरंग” या उपक्रमांतर्गत, उत्तर अमेरिकेतील मराठी समाज आपल्या संकटग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभा आहे हे दाखवण्यासाठी “मराठवाडा पूरग्रस्त मदतनिधी” उपक्रम सुरु केला.
सुरुवातीला बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी ला ₹१ लाख देणगी जाहीर केली.
निधीसंकलनासाठी आम्ही $२५,००० चे लक्ष्य ठरविले होते, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रेमळ आणि निःस्वार्थ योगदानातून $६०,००० पेक्षा जास्त निधी जमा झाला!

मंडळानुसार देणगीचा तपशील:

(उरलेली रक्कम वैयक्तिक देणग्यांमधून जमली)

आम्ही सर्व मंडळांच्या अध्यक्षांचे, बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधींचे, तसेच सर्व देणगीदारांचे मनापासून आभार मानतो.

देणग्यांमधून जमलेली सर्व रक्कम खाली उल्लेख केलेल्या संस्थांना देण्यात आली:

या सर्व संस्थांनी पूरग्रस्त भागात मदत उपक्रम सुरू केले असून, बृहन्महाराष्ट्र मंडळाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली – त्याबद्दल आम्ही या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानतो.

MANAVLOK (Marathwada Navnirman Lokayat) NGO distributed water pumps, wiring cables, and other essential materials to farmers in need in Undargaon village, Solapur district, Maharashtra.

BMM encourages donations to these organizations:

You can even donate to BMM and we will send the money to above organizations.

Or

Donate using Zelle:
zelle@bmmonline.org