BMM वृत्त दिवाळी अंक २०२५ साठी आवाहन

नमस्कार मंडळी,

BMM वृत्तातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकाला या वर्षी ४२  वर्षं पूर्ण होत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे!  BMM वृत्ताच्या  ऑक्टोबर – नोव्हेंबरच्या संयुक्त  दिवाळी अंकासाठी, आम्ही उत्तर अमेरिका स्थायिक, तसेच भारतासहीत जगातील इतर देशातील देखील मराठी लेखक, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकारांना अभिरुचीसंपन्न साहित्य व दर्जेदार कलाकृती पाठविण्याचे आवाहन करीत आहोत. या अंकाला वैविध्यपूर्ण बनविण्यासाठी आपले लेख, कविता, नर्म विनोद, चुटके, हास्यचित्रे, प्रवास वर्णन आणि चविष्ट पाकक्रिया सुद्धा जरूर पाठवाव्यात. 

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख: ऑगस्ट ३१, २०२५

अपेक्षित साहित्य व शब्दमर्यादा:

* कथा, लेख, निबंध: १००० शब्द (फोटो रहित)

*कथा, लेख, निबंध: ८०० शब्द (फोटो सहित)

* चुटके: १५० शब्द 

* पाकक्रिया, संकीर्ण उपयुक्त माहिती: ३०० शब्द 

* कविता: २० ओळी

साहित्य पाठवण्याचे नियम -

  1. साहित्य आपले स्वत:चे असावे आणि इतरत्र प्रकाशित झालेले नसावे. 
  2. रुपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळ लेखकाच्या नावासह तसा उल्लेख असणे आवश्यक आहे. 
  3. साहित्याच्या निवडीत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. निवडलेल्या साहित्यात मोजकेपणा, सुस्पष्टपणा आणि शुध्दलेखन  यांच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करण्याचा हक्क संपादकांना राहील.
  4.  लेखकांनी साहित्याबरोबरच स्वत:चा संपूर्ण पत्ता, फोन नंबर आणि ई-पत्ता (email address) पाठवणे आवश्यक आहे.
  5. निवड न झालेले साहित्य परत पाठवले जाणार नाही.
  6. *A Word file should be emailed to vrutta@bmmonline.org. While sending email, please have the email Subject added as “Diwali Ank”
  7. टीप: http://www.google.com/ transliterate या वेबसाईटवर मराठीमध्ये टाईप करता येते. नंतर ते Microsoft Word मध्ये copy करून, save करून किंवा email मध्ये copy करून vrutta@bmmonline.org ह्या address वर पाठवावे.

जाहिराती आणि शुभेच्छा संदेश दर:

Full Page: $400 

Half Page: $250 

Quarter Page: $150 

BMM वृत्तात जाहिरात किंवा शुभेच्छा संदेश देण्यासाठी संपर्क साधावा:

Email:
santosh.salvi@bmmonline.org 
Vrutta@bmmonline.org

 

आपली मुद्रणसिध्द जाहिरात किंवा शुभेच्छा संदेश ‘वृत्त दिवाळी अंक’ साठी ऑगस्ट ३१, २०२५ च्या आत मिळणे आवश्यक आहे.

Youth Corner: (age 5 to 18 years):

 Vrutta team invites the second generation of Marathi American authors, poets, and artists to contribute to the ‘Youth Corner’ section of ‘Vrutta Diwali Ank 2025’, our annual Diwali Magazine. Send your articles, stories written in English OR Marathi. You can also send your drawings and artwork. All youth articles should be submitted before August 31, 2025, to vrutta@bmmonline.org. Your name, age, and email address may be included with your submission. While sending email, please have the Subject added as “Diwali Ank”

आभारी आहोत,

BMM Vrutta Team