पौरोहित्य (Hindu Priest)

घरोघरी पौरोहित्य - व्यवसाय नव्हे तर काळाची गरज उत्तर अमेरिकेतील मराठी बंधू - भगिनींसाठी पौरोहित्याचे online प्रशिक्षण वर्ग

मूलभूत स्तर (Level One)

कालावधी: २८ सत्रे (Sessions)

|| शास्त्रोक्त मंत्रोच्चारण || || स्तोत्र पठण || || षोडशोपचार पूजाविधी ||
|| नित्योपयोगी पूजा || || सत्यनारायण पूजा || || गणपती प्रतिष्ठापना ||
|| वास्तु पूजा |||| गृहप्रवेश पूजा ||

  • वेळ: दर शनिवारी किंवा रविवारी सकाळी दीड ते दोन तासाचे सत्र
  • अनुभवी आणि ज्ञानी गुरूजींकडून मार्गदर्शन
  • स्तोत्रांचे ऑडिओ आणि षोडशोपचाराचे व्हिडिओ उपलब्ध

हिंदू धर्मात ऋग्वेदाच्या काळापासून पौरोहित्याची परंपरा प्रचलित आहे. काळाच्या ओघात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, तरी विविध धार्मिक संस्कार, देवतांचे पूजन, कुलाचार आणि धार्मिक उत्सव या बाबतीत मात्र माणसाचे मन भावुक असते. हे संस्कार परंपरेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने व्हावेत, अशी मनोमन इच्छा असते आणि अशा वेळी पुरोहितांची निकड भासते.

या अभ्यासक्रमातून खालील बाबी शिकविल्या जातील:

  • पूजेची तयारी
  • पूजेची मांडणी
  • पूजा विधी

आमची वैशिष्ट्ये

  • अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त वेळ पूजा विधी शिकवण्यासाठी वापरला जाईल
  • वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून उच्चारण करून घेतले जाईल आणि काही सुधारणा असतील तर त्याविषयी मार्गदर्शन केले जाईल
  • पूजा विधी करताना त्या विधीची माहिती, त्याचे महत्त्व समजावून सांगितले जाईल, त्यामुळे पूजा यांत्रिकपणे न करता अर्थ समजून केली जाईल
  • वर्ग सुरू होताना पूजा विधीविषयीची २ पुस्तके/pdf पाठवली जातील, जी वाचून पूजा समजून येईल
  • मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या – त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणे सुलभ होईल
  • अनुभवी, ज्ञानी आणि शिकवण्याची आवड असलेला पुरोहित वर्ग

अभ्यासक्रमाचे नियम

  • वयोमर्यादा: 15 वर्षे आणि त्यापुढे
  • देवनागरी लिपीतील मराठी किंवा हिंदी अक्षर ओळख
  • महिला-पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश
  • WhatsApp ग्रुपद्वारे सूचना
  • सत्र चालू असताना प्रत्येकाचा व्हिडीओ ऑन असणे आवश्यक

वर्गाचे वेळापत्रक

क्रमांक प्रशिक्षणातील विषय कालावधी (सत्र) सत्र क्र. पासून ते सत्र क्र. पर्यंत
1
षोडशोपचार पूजा, सत्यनारायण पूजा, पुरुष सूक्त
15
सत्र 1 ते 15
2
पुरुष सूक्त पुनरावृत्ती
2
सत्र 16 ते 17
3
गणपती अथर्वशीर्ष, गणपती प्रतिष्ठा, वास्तु पूजन, गृहप्रवेश, नित्य पूजा
9
सत्र 18 ते 26
4
गणपती अथर्वशीर्ष पुनरावृत्ती
2
सत्र 27 ते 28

टीप: प्रशिक्षण मौखिक पद्धतीने असल्याने वेळापत्रकात दिलेल्या सत्रांपेक्षा 2/3 सत्रे कमी-जास्त होऊ शकतात.

For additional information feel free to call,

Ranjit Kamat: +1-713-598-9859
BMM Volunteer Lead – Paurohitya

Gaurav Patwardhan: +1-573-202-3626
BMM EC

प्रगत स्तर (level Two)

कालावधी 44 सत्रे (Sessions)

|| प्रगत स्तर फाउंडेशन || मौंज व सोडमौंज || विवाह प्रयोग ||
|| वास्तुशांती || भूमिपूजन ||

  • वेळ – दर शनिवारी किंवा रविवारी सकाळी दीड ते दोन तासाचे सत्र
  •  अनुभवी आणि ज्ञानी गुरुजींकडून मार्गदर्शन
  •  स्तोत्रांचे ऑडिओ आणि षोडषोपचाराचे व्हिडिओ उपलब्ध

हिंदू धर्मात ऋग्वेदाच्या काळापासून पौरोहित्याची परंपरा प्रचलित आहे. काळाच्या ओघात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, तरी विविध धार्मिक संस्कार, देवतांचे पूजन, कुलाचार आणि धार्मिक उत्सव या बाबतीत मात्र माणसाचे मन भावुक असते. हे संस्कार परंपरेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने व्हावेत, अशी मनोमन इच्छा असते आणि अशा वेळी पुरोहितांची निकड भासते.

विविध प्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या

  • पूजेची तयारी
  • पूजेची मांडणी
  • पूजा विधी

या विषयीचे ज्ञान या अभ्यासक्रमातून दिले जाईल.

तसेच या कार्यांसाठी जे विधी करायला लागतात त्यांची पूर्ण संथा दिली जाईल.
कोर्स पूर्ण केल्यावर पुस्तकातून वाचून विधी करणे शक्य होईल.

आमची वैशिष्ट्ये

  • अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त वेळ पूजा विधी शिकवण्यासाठी वापरला जाईल
  • वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून उच्चारण करून घेतले जाईल आणि काही सुधारणा असतील तर त्याविषयी मार्गदर्शन केले जाईल
  • पूजा विधी करताना त्या विधीची माहिती, त्याचे महत्त्व समजावून सांगितले जाईल, त्यामुळे पूजा यांत्रिकपणे न करता अर्थ समजून केली जाईल
  • वर्ग सुरू होताना पूजा विधीविषयीची २ पुस्तके/pdf पाठवली जातील, जी वाचून पूजा समजून येईल
  • मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या – त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणे सुलभ होईल
  • अनुभवी, ज्ञानी आणि शिकवण्याची आवड असलेला पुरोहित वर्ग

अभ्यासक्रमाचे नियम

  •  मूलभूत स्तर झाल्यावर या स्तराला सुरुवात करता येईल.
  •  मूलभूत स्तर झाला नसल्यास त्या स्तराच्या समान ज्ञान असलेल्या व्यक्तींच्या तयारीची पाहणी
    वर्गाचे शिक्षक करतील आणि त्यांच्या शिफारशीनुसार परवानगी दिली जाईल.
  • वयोमर्यादा: 15 वर्षे आणि त्यापुढे
  • देवनागरी लिपीतील मराठी किंवा हिंदी अक्षर ओळख
  • महिला-पुरुष दोघांनाही मुक्त प्रवेश
  • WhatsApp ग्रुपद्वारे सूचना
  • सत्र चालू असताना प्रत्येकाचा व्हिडीओ ऑन असणे आवश्यक

वर्गाचे वेळापत्रक

प्रगत स्तर 2 (Level Two) - सहस्तर माहिती

प्रगत स्तर फाउंडेशन – (sessions – 11)

संकल्प पंचगव्य मेलन पंचगव्य प्राशन पवित्र धारण जानवे बदलणे/ घालणे
गणेश पूजन पुण्याहवाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध देवदेवक बसवणे

प्रगत स्तर – मौंज व सोडमौंज - (sessions – 13)

गणेश पूजन संकल्प उपनयन यज्ञोपवीत धारण होम स्थालीपाक
गायत्री मंत्र भिक्षावळ अनुप्रवचनीय होम संध्या सोडमौंज

प्रगत स्तर 2 - विवाह प्रयोग - (sessions -10 )

वाग्दान सीमांत पूजन वरभेट वहिणीचा मान कन्यादान कंकण बंधन
मंगलसूत्र विवाह होम (पाहुण्यांचे, लाजाहोम , सप्तपदी ) सूनमुख लक्ष्मीपूजन

प्रगत स्तर 2 - वास्तुशांती - (sessions -7)

वास्तुशांती, ग्रहयज्ञ, नवग्रह शांती (प्रत्यक्ष देवतांसह ४२ मंत्र) संकल्प
वास्तु मंडळ देवता आवाहन व पूजन नवग्रह मंडळ आवाहन व पूजन अन्वाधान व हवन
बळीदान पूर्णाहुती अभिषेक अर्पणपूजा गृहप्रवेश भरण पूजा
दारावरचे हात उठवणे

प्रगत स्तर 2 - भूमिपूजन - (sessions -3)

स्वस्तिवाचन – कुलदेवता स्मरण – संकल्प – गणेश पूजन – कलश पूजन – पंचवाक्य पुण्याहवाचन –
मुख्य देवता स्थापन व पंचोपचार वा षोडशोपचार पूजा – विश्वकर्मा पूजन – शिला पूजन –
पंचशिला पूजन – श्रीफळ अपर्ण – भूमी खनन – देवता विसर्जन

क्रमांक प्रशिक्षणातील विषय कालावधी (सत्र) सत्र क्र. पासून ते सत्र क्र. पर्यंत
1
प्रगत स्तर फाउंडेशन
11
सत्र 1 ते 11
2
प्रगत स्तर – मौंज व सोडमौंज
13
सत्र 12 ते 24
3
प्रगत स्तर – विवाह प्रयोग
10
सत्र 25 ते 34
4
प्रगत स्तर – वास्तुशांती
7
सत्र 35 ते 41
5
प्रगत स्तर – भूमिपूजन
3
सत्र 42 ते 44
Total: 44