
वारसा, जो वडिलोपार्जीत आलेला आणि पुढच्या पिढीला सुपूर्त केलेला असा वारसा. मराठी समाजाने उत्तर अमेरिकेत स्थलांतर करताना बरोबर आणला संस्कृतीचा, शिक्षणाचा, आठवणींचा, आशीर्वादांचा आणि मराठी मातीचा वारसा. आजचा उत्तर अमेरिकेतील मराठी समाज कोण आहे हे समजून घ्यायचे असेल तर आपण कुठून आलो, का आलो, आणि इथल्या मातीत आपली मूळे रोवून कसे भरभराटीला आलो हे शोधलं पाहिजे, त्याची नोंद करून, ते जतन केलं पाहिजे. अश्या गोष्टी एकत्रित केल्या की सर्वाना आणि भावी पिढीला आपल्या प्रवासाची झलक मिळेल. त्यासाठी चालू केला आहे “वारसा” हा प्रकल्प.
रसा टीमने आपल्या समाजातील १९५०-१९६५ च्या सुमारास आलेल्या १२ व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. ह्या सर्व मुलाखती यूट्यूबच्या वारसा चॅनलवर उपलब्ध आहेत. ह्या मुलाखतीना प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. प्रत्येकी विडियोला ५०० ते ९०० हून अधिक views मिळाले.
वारसाचे भाग (episodes) पाहण्यासाठी यूट्यूब चॅनेलला भेट द्या
Our Team

मेधा गोडबोले

अजित नातू

राजन पेडणेकर

क्रांती गोडबोले

महेश पाटील

शैलेश देशपांडे

विशाल कवीश्वर

निहिरा जोशी देशपांडे

शीतल रांगणेकर

अथर्व रानडे
संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन : मेधा गोडबोले
तांत्रिक सहाय्य : शैलेश देशपांडे, महेश पाटील
ग्राफिक्स : शीतल रांगणेकर
लोगो डिझाईन : अथर्व रानडे
थीम सॉन्ग नियोजन: विशाल कवीश्वर
पार्श्वगायिका: निहिरा जोशी देशपांडे
पार्श्वगायक: विशाल कवीश्वर
गीत : शैलेश देशपांडे
कार्यकर्ते व मुलाखतकार: मेधा गोडबोले, अजित नातू, राजन पेडणेकर, शैलेश देशपांडे, क्रांती गोडबोले आणि महेश पाटील
भाग पहिला: "तेथे कर माझे जुळती ":
गणितज्ञ, संस्कृत पंडित, गायक, संगीतकार अशा ऋषितुल्य डॉ. रमेश गंगोळी यांनी बालवयात आलेल्या शारीरिक आपत्तीवर खंबीरपणे मात केलेले असामान्य कर्तृत्वाचे, आदरणीय, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व. यांची मुलाखत, मुलाखतकार: मेधा गोडबोले;
भाग दूसरा : "गोष्ट पहिल्या लग्नाची":
प्रबोध लेले आणि विजया गोखले यांच्या ७ ऑगस्ट १९६१ रोजी चॅपल UOM कार्यग्रहात झालेल्या अमेरिकेतील पहिल्या महाराष्ट्रीयन लग्नाची कहाणी, मुलाखतकार: मेधा गोडबोले;;
भाग तिसरा: "इवलेसे रोप लावियेले द्वारी":
अनीताताई गोडबोले ह्यांच्या शब्दात शिकागो मंडळाची व विशेषतः बीएमएम ची मुहूर्तमेढ कशी रचली ही माहिती प्रेक्षकांना ऐकायला मिळेल, मुलाखतकार: अजित नातू;
भाग चौथा “उगवली स्वातंत्र्याची पहाट”:
श्री प्रभाकर घाटे ह्यांनी अनुभवलेले भारताच्या स्वातंत्र्याच्या उगवत्या सूर्याच्या दर्शनाआधी वातावरण, प्रत्यक्ष स्वतंत्रतादिनाचा, म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ चा, अनुभव, मुलाखतकार: अजित नातू;
भाग पाचवा ”माझ्या गोव्याच्या भूमीत ”:
श्री. रवि गावकर यांच्या ओपापासून अमेरिकेपर्यंत केलेल्या खडतर प्रवासाची कहाणी, मुलाखतकार: मेधा गोडबोले;
भाग सहावा ”शिवाजी पार्क दादर ते युनायटेड नेशन न्युयॉर्क ”:
श्री प्रकाश रणदिवे यांचा अवघ्यां 18 व्या वर्षी सोडलेले शिवाजी पार्क दादर ते युनायटेड नेशन न्युयॉर्क हा प्रवास, मुलाखतकार: राजन पेडणेकर;
भाग सातवा ”कथा अग्रणींच्या , तुळशी बाग ते Fifth Avenue ”:
टोरांटोच्या मराठी समाजाचा एक अविभाज्य भाग झालेल्या दुर्गाताई पाच्छापुरकर त्यांच्या रसाळ भाषेत ह्या सर्व अग्रणी व्यक्तींची आपल्याला ओळख करून देत आहेत कथा अग्रणींच्या , तुळशी बाग ते Fifth Avenue ह्या सत्रात, मुलाखतकार: मेधा गोडबोले;
भाग आठवा “मन तळ्यात मळ्यात”:
सौ लता आणि श्री बळवंत कार्लेकर कथन करीन आहेत त्यांच्या तळ्यात मळ्यात झालेल्या आयुष्याच्या प्रवासाची कहाणी, मुलाखतकार: राजन पेडणेकर;
भाग नववा “मार्ग माझा वेगळा, रंग माझा आगळा”:
वैद्यकीय क्षेत्रात विद्वत्ता गाजवणारे डॅा. शांताराम तळेगावकर यांच्या कला संग्रहाच्या प्रवासाची कथा, मुलाखतकार: शैलेश देशपांडे;
भाग दहावा “दुसरा मधुचंद्र .. नवे राज्य, नव्या वाटा”:
मीनाक्षी गोखले यांची उत्तर अमेरिकेतील स्थलांतराची कहाणी, मुलाखतकार: महेश पाटील
भाग अकरावा “बहुरुप्याचे भारूड, राजदूत ते नटवर्य”:
श्री. प्रभाकर साठे, यांची पुणे ते नेपाळ ते मंगोलिया ते इराण ते सॅन फ्रांसिस्को प्रवासाची कहाणी, मुलाखतकार: मेधा गोडबोले;
भाग बारावा “योगायोगाच्या गोष्टी मी आणि डॉक्टर आनंदीबाई”: -
श्री. विराज सरदेसाई यांची क्रांती गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत