Get the T-shirt and Medal design

।। जय जय राम कृष्ण हरी ।।

नमस्कार मंडळी

परदेशातील वारी पंढरीची

जून-जुलै महिन्यात होणाऱ्या या वारी योगे आपल्याला “भक्ती, व्यायाम, आणि समाजसेवा” यांचा त्रिवेणी संगम अनुभवाची संधी मिळणार आहे!!

तुम्हाला माहीतच आहे की दरवर्षी देहू व आळंदी येथून हजारो वारकरी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने, पंढरपूरच्या वारीला जातात.

देहू/आळंदी ते पंढरपूर हे अंतर अंदाजे १५० मैलांचे आहे (अंदाजे २५० किलोमीटर) – हे अंतर वारकरी १९ ते २० दिवसात पूर्ण करतात.

यावर्षी आपणही वारीच्या दरम्यान जेवढे जमेल तेवढे अंतर तेवढ्याच कालावधीत (जवळजवळ तीन आठवड्यात) पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ढोबळ मानाने दररोज २, ४, ६, किंवा ८ मैल चालले तर अनुक्रमे वारीचे २५, ५०, ७५, किंवा १००% अंतर पूर्ण होईल. कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे चालूनही १००% अंतर पूर्ण करू शकतात. (उदाहरणार्थ: आई, वडील आणि दोन मुलांनी दररोज २ मैल चालले तरी एकत्रितरित्या वारीचे १००% अंतर पूर्ण होईल).

माऊलीचा जप किंवा संतांचे अभंग ऐकत ऐकत चालताना किंवा धावताना ठरलेले अंतर कधी पूर्ण होते ते कळत पण नाही. मी स्वतः गेल्यावर्षी अशा प्रकारची “वारी” पूर्ण केली.

या वारीच्या निमित्ताने “समाजरंग”तर्फे आम्ही एक सामाजिक बांधिलकीचा प्रस्ताव घेऊन येत आहोत.

यानुसार सहभागी होणारे प्रत्येक मंडळ एक किंवा त्याहून अधिक सामाजिक संस्था निवडू शकते आणि आपल्या मंडळातील मंडळींना या संस्थांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करू शकते.

वारीमध्ये भाग घेणाऱ्यांना ही मदत करणे बंधनकारक नाही आणि पूर्णपणे ऐच्छिक आहे

जर कुणी कमीत कमी $५० डॉलरची ऐच्छिक देणगी दिली, तर त्यांना एक टी-शर्ट तसेच विठोबा रुक्मिणीचे चित्र असलेले (३ इंचाचे) पदक मिळेल. जर जास्तीची देणगी मिळाली तर नक्कीच आवडेल.

या टी-शर्टवर बृहन्महाराष्ट्र मंडळाचा, तसेच तुमच्या मंडळाचा मानचिन्ह (लोगो) असेल. तुमच्या शहरातील प्रायोजकांना या टी-शर्टवर मागील बाजूला जाहिरात करायची संधी आहे, ज्यायोगे त्यांनी दिलेला निधी पूर्णपणे टी-शर्ट आणि पदकांच्या खर्चासाठी वापरता येईल.

५०-१००% वारीचे अंतर पूर्ण करणाऱ्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे एक प्रशस्तीपत्रक पण देण्यात येईल.

$१०० पेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांना, टी-शर्ट आणि पदक ठेवण्यासाठी एक छोटीशी खास पेटी देण्यात येईल.

नियमित व्यायाम केल्याने आरोग्याचे फायदे तर होतीलच, पण त्याचबरोबर एखाद्या सामाजिक उपक्रमाला हातभार लावल्याने मानसिक समाधान पण मिळेल.

तरी लवकरात लवकर हा उपक्रम आपल्या मंडळात जाहीर करा आणि जास्तीत जास्त लोकांना वारीमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करा. परत एकदा – सामाजिक संस्थांना देणगी ही ऐच्छिक आहे – बंधनकारक नाही.

सर्व मंडळे शनिवार, १४ जून रोजी वारी सुरू करू शकतात, तर वारीची समाप्ती रविवार, ६ जुलै रोजी आषाढी एकादशी होईल. एखाद्या मैदानात किंवा देवळात जमून विठू माऊलीच्या नामघोषाने तुम्ही वारीची सुरवात करू शकता.

कृपया ३० एप्रिल पर्यंत किती लोकांना टी-शर्ट आणि पदके हवी आहेत ते कळवावे तसेच निधीसंकलन ही करावे, त्यानुसार आम्हाला नियोजन करता येईल (पदके वेळेत मिळवण्यासाठी २ महिन्याचा कालावधी आवश्यक आहे).

T-Shirt Size Chart

बृहन्महाराष्ट्र मंडळ समाजरंग- सामाजिक कार्य उपक्रम / BMM Samajrang – Social Cause Initiative

बृहन्महाराष्ट्र मंडळाचा सामाजिक कार्य उपक्रम

  • या उपक्रमांतर्गत प्रत्येक मराठी मंडळाने आपल्यामंडळातील सभासदांना बरोबर घेऊन एखादे भरीव सामाजिक कार्य करावे अशी इच्छा आहे.
  • यातून जमवलेला निधी महाराष्ट्रातील किंवा तुम्ही राहता त्या शहरातील कुठल्यातरी प्रकल्पासाठी वापरावा.
  • या प्रकल्पांसाठी हा निधी वापरला आहे, तिथे हा निधी कोणत्या मंडळांनी पाठवला आहे याची पाटी लावण्याची विनंती करता येईल, ज्यामुळे इतरांना पण असे काही कार्य करावे याची स्फूर्ती मिळेल.
  • तुमच्या मंडळात कोणी सामाजिक कार्य करत असेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन एखादा प्रकल्प तुमचे मंडळ हाती घेऊ शकते.
  • शक्यतो माहिती असलेल्या संस्थेबरोबर काम करावे, ज्यामुळे पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होणार आहे याची देणगीदारांना खात्री देता येईल.
  • एखादा मोठा प्रकल्प असेल तर काही मंडळे एकत्र येऊन काम करू शकतात.
  • अशा या प्रकल्पांमुळे आपण पुढील पिढीच्या मुलांना समाजसेवेचे बाळकडू आतापासूनच देऊ शकतो.
  • इकडे जमलेली छोटी रक्कम भारतात किती मोठा बदल घडवू शकते याची समज आपल्या मुलांना लहानपणीच होऊ शकते.

A few causes to raise funds

  • Student Education (sponsor a child).
  • School infrastructure improvement.
  • Street Children’s welfare.
  • Women health and empowerment.
  • Rebuilding families affected by farmers’ suicides.
  • Drought and water conservation projects.
  • Welfare of Widows of fallen Indian soldiers.
  • Adopt a village (infrastructure improvement).
  • Old age home/disabled people – related projects

Goal Examples

  • Sponsoring 1-year education of 250 students.
  • Sponsoring 250 orphan students’ expenses/field trips.
  • Building/Renovating a school library.
  • Sponsoring 3-5 mobile buses for Street Children.
  • Rebuilding farmer-suicide-related affected families.
  • Building 5 water tanks/wells in drought-affected areas.
  • Small loan to encourage women’s entrepreneurship.
  • Welfare of 250 widows of the fallen Indian soldiers.
  • Adopt a village (infrastructure improvement).
  • Sponsoring 50 wheelchairs/beds at old age homes.

‘Live Here – Give Here’ Campaign

  • Support a project that will benefit your local community. Please notify your city about this.
  • This will be a good opportunity for your kids to get involved (E.g. helping senior citizens, trail cleanup).
  • If you have a special skill set then you can help someone in need (E.g. doctor, attorney, tax consultant, etc.)
  • You can volunteer with an org addressing issues like substance abuse, mental health, etc.
  • Mandal can donate time/expertise/Money.

Recommended Steps

  • Discuss this proposal within your EC.
  • Get recommendations from your EC members.
  • If interested, identify a lead or a team.
  • Select the cause.
  • Set the goal and timeline.
  • Select the NGO that you would like to help.
  • Announce the fundraiser within your Mandal.
  • Perform the administrative tasks (marketing, reporting, providing receipts, transferring money, keeping transparency with donors, etc.)

Recommended NGOs

Organizations Area(s) of Focus
Welfare of orphan students from farmer’s suicide.
Student Education, Women health and Empowerment, Rural Development
Student hostel for rural students studying in Pune
More than 3 million free eye surgeries bringing light to people’s lives.
Breast cancer awareness & Mammogram related help.
Street children welfare (Mobile school program).
Women and Children Empowerment in rural areas.
The Pancham Initiative – Village Adoption Program.
Organization working to improve neonatal mortality in rural regions across the world.
Education, Women Empowerment, Disaster Response.

Additional Recommendations

  • Ask your members to donate through their company’s Corporate Matching program.
  • Some companies even donate money for the hours you volunteer at local non-profit organizations.
  • Some companies offer 3x match during “Giving Tuesday”.
  • Please ask your friends and families to donate to your Mandal’s cause.
  • Donate 10% of your Mandal’s gain to a social cause.

Very Important to Note

  • If you are donating to an organization in India, confirm FCRA certificate from Govt. of India.
  • If donations were for a specific goal, send only to that cause.
  • If challenges arise in transferring, inform donors and return funds if requested.

What is next?

  • Social Cause initiative team has been formed.
  • A team member will reach out.
  • This initiative is optional.
  • You may collaborate with neighboring Mandal.
  • BMM Vrutta will highlight your story.

Social Cause Initiative Team Members

  • Prasad Panwalker
  • Vidya Hardikar-Sapre
  • Manjusha Naik
  • Mangesh Khadilkar
  • Vaishali Mahavir
  • Deepti Kanhere
  • Manisha Lele
  • Manish Dharme

Contact