BMM Reshimgathee
लेक लाडकी ह्या घरची होणार सून मी त्या घरची पासून “Darling I will love you till we are 70” by Ed Sheeran च्या काळात सुद्धा लग्न हा आयुष्यातला एक मोठा पडाव आहे। लग्न तेव्हा असो वा आज मन जुळणे, मत पटणे ह्याच धरती वर जमतात आणि टिकतात। असा मानस पटणारा जोडीदार मिळणे म्हणजे अनेक होतकरू स्थळांचे संशोधन करण्या सारखेच आहे। त्या काळात जशी घरची मोठी माणसं स्थळ शोधून, बघून गाठ बांधायचे, तशी आता रीत राहिलेली नाही। आता वधु आणि वर हे एकमेकांशी बोलून आपले लग्न ठरवतात। परंतु सर्वांनाच कॉलेज मध्ये, मित्रमैत्रीच्या घोळक्यात, ऑफिस मध्ये अशी जुळवणी करता येते असे नाही।आधुनिक वधू आणि वर संशोधन करण्यासाठी असलेले आराखडे पण विविध आहेत, म्हणतात ना व्यक्ती तितक्या वल्ली। तरी लग्नाची स्वप्ने दाखवणाऱ्या गाण्यात रमणारया सर्व होतकरू साठी मन जुळवताना लागणारी मदत करेल अशी आधुनिक वधु वर सूचक म्हणजेच matrimonial site आहे “रेशीम गाठी”।