Prasad Panwalkar

Austin, TX

प्रसाद पानवळकर हे ऑस्टिनचे रहिवासी आहेत – त्यांच्या पत्नीचे नाव सौ. निवी आणि त्यांना २ मुले, नील (College Sophomore) आणि प्रिया (7th Grade), आहेत.

समाजकार्याची आवड असल्याने ते अनेक सामाजिक संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. २०१३ साली ते ऑस्टिन मराठी मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांच्या समितीने ‘ऑस्टिन मराठी शाळे’ची स्थापना केली आणि या शाळेत अनेक वर्षे शिक्षक म्हणून काम करून शाळेच्या पुस्तक तसेच app च्या निर्मिती करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे.  याच बरोबर ते २०१३-२०१५ च्या बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे कार्यकारणी सदस्यही  होते. गेली ३ वर्षे ते ‘ज्ञान प्रबोधिनी फौंडेशन’ चे उपाध्यक्ष, तसेच निधीसंकलन विभागाचे प्रमुख आहेत. २०१३ सालच्या बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात त्यांना ‘Ironman 70.3’ स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल “Special Jury Award” देऊन गौरविले होते.

समाज कार्यासाठी निधीसंकलन, आरोग्य संदर्भातील जागरूकता, आणि उत्तर अमेरिकेतील मराठी शाळेच्या विकासावर काम करण्याचा त्यांचा मानस आहे.