Manjusha Naik

West Palm Beach, FL

मंजुषा नाईक – वेस्ट पाम हीच फ्लोरिडाची रहिवासी आहे. पती डॅा. एकनाथ व मुलगा समीर असे हे त्रिकोणी कुटूंब. 

गेली १५ वर्ष टॅम्पा मंडळाची सक्रीय सभासद , सध्या MMOSF ( Maharashtra Mandal of South Florida ) ची अध्यक्षा , फ्लोरिडा उत्तररंग विभागाची संस्थापक, महाराष्ट्र फाउंडेशनची Board of Director , तसेच गेली १५ वर्षे ‘अभिरुची’या टॅम्पा येथून प्रकाशित होणाऱ्या मराठी वार्षिक अंकाची संस्थापक व सह संपादिका. 

BMM च्या समिती तर्फे रेशीमगाठी व उत्तररंग या उपक्रमांवर काम करुन आपल्या सर्व मराठी मंडळांना एकत्र आणून हा उपक्रम पुढे नेण्याचा मानस आहे.